Advertisement

विधानसभेसाठी शुक्रवारपासून शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरूवात

शिवसेनेचे (Shiv sena) सचिव आदेश बांदेकर (Aadesh bandekar) यांची शुक्रवारपासून 'माऊली संवाद' यात्रा सुरू होणार आहे.

विधानसभेसाठी शुक्रवारपासून शिवसेनेच्या 'माऊली संवाद' उपक्रमाला सुरूवात
SHARES

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan sabha election) पार्श्वभूमीवर शिवसेना जय्यत तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांचा 'आदित्य संवाद' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांची 'महाजनादेश' यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेला संपुर्ण महाराष्ट्रातील नते मंडळी उपस्थित दर्शवत आहेत. अशातच आता शिवसेनेचे (Shiv sena) सचिव आदेश बांदेकर (Aadesh bandekar) यांची शुक्रवारपासून 'माऊली संवाद' यात्रा सुरू होणार आहे.

राज्यातील महिलांशी संवाद

यंदा विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील लोकांशी, शेतकऱ्यांशी, कष्टकऱ्यांशी आणि समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहोचण्याचं शिवसेनेचं लक्ष आहे. त्यामुळं शिवसेनेने 'माऊली संवाद' यात्रा सुरू करण्याचं ठरवलं आहे. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर माऊली संवादामार्फत राज्यातील महिलांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवार २ ऑगस्टपासून या माऊली संवादाला सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या आदिवासी भागाची याकरीता निवड करण्यात आली आहे.

माऊली संवाद यात्रा

आदेश बांदेकर माऊली संवादातून पहिल्या टप्प्यात पालघर आणि ३ ऑगस्टला भिवंडीत जाऊन महिलांशी संवाद साधणार आहेत. ४ ऑगस्टला बीड या ठिकाणी माऊली संवाद यात्रा पोहोचणार असून, या ठिकाणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे माऊली संवाद यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मुंबई उपनगरी रेल्वेचे गर्दीच्या वेळी जादा तिकीट दर?

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा