Advertisement

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात
SHARES

गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या घराच्या गृहिणींसाठी खूशखबर आहे. कारण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६२.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बाजारातील किंमत ५७४.५० रु.

विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची बाजारातील किंमत आता ५७४.५० रुपये असेल. सिलिंडरचे हे नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर १००.५० रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलिंडरमध्ये १६३ रुपयांची कपात करण्यात आली आहे.

रुपयाची किंमत मजबूत

आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी १४.२ किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली आहे. अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी १४२.६५ रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळं ग्राहकांना नव्या दरानुसार सिलिंडर मिळणार आहे.



हेही वाचा -

मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद

अकरावी प्रवेशाची तिसरी यादी गुरूवारी होणार जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा