Advertisement

मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद

जुलै महिन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत जुलै महिन्यात १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे.

मुंबईत जुलै महिन्यात विक्रमी पावसाची नोंद
SHARES

यंदा जुलै महिन्यात पावसानं मुंबईत दुसऱ्यांदा विक्रमी हजेरी लावली आहे. मुंबईत बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची ६५.१ मिलीमीटर नोंद झाली असता जुलै महिन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत जुलै महिन्यात १ हजार ४६४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. याआधी १९५९ सालानंतर २०१४मधील जुलै महिन्यात मुंबईत १ हजार ४६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

मुसळधार पावसाची हजेरी

मुंबईत जून आणि जुलै महिन्यात मुसळधार आणि तीव्र मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं मुंबई उपनगरांमध्ये दोन्ही महिन्यांमध्ये मिळून १९७९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसंच, मुंबईमध्ये १५१६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याशिवाय, मुंबईसह उपनगरात गुरूवारी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

पाणीसाठ्यात वाढ

आतापर्यंत कोलाबा परिसरात १५१६. मिलीमीटर, तर सांताक्रुझ परिसरात १९७९. मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणारी काही धरणंही पूर्णपणे भरली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात ११ दिवसांत तब्बल ३२ टक्के पाणीसाठा वाढला असून, बुधवारी सकाळी हा पाणीसाठा १२ लाख ४० हजार दशलक्ष लिटरपर्यंत (८५ टक्के) पोहोचला आहे.हेही वाचा -

राज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र?संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा