Advertisement

राज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र?

ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची कोलकात्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली.

राज ठाकरेंनी घेतली ममता दीदींची भेट, ईव्हीएमविरोधील लढ्यात येणार एकत्र?
SHARES

ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची कोलकात्यातील मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊणतास चर्चा झाली. निवडणुकीतील ईव्हीएमचा वापर या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती राज यांनी प्रसार माध्यमांना दिली. सोबतच ईव्हीएमच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक आयोग आणि न्यायालयाकडून कुठलीही अपेक्षा नसल्याचंही राज म्हणाले.

काय म्हणाल्या ममता दीदी?

बैठकीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ईव्हीएमला आमचा आधीपासूनच विरोध आहे. त्यासाठी आम्ही न्यायालयातही धाव घेतली होती. सद्यस्थितीत अमेरिका, जपान, ब्रिटनमध्येही बॅलेट पेपरने निवडणुका होत असताना आपल्याकडेच ईव्हीएम कशाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तर, राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा वापर व्हावा या मागणीसाठी मनसेतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. या मोर्चाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी मी इथं आलो होतो. यावेळी आमचा पक्ष लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया ममता दीदींनी दिल्याची माहिती राज यांनी दिली.

कुणाकडूनही अपेक्षा नाही 

ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी न्यायालयात जाणार का? या प्रश्नावर मला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून कुठलीही अपेक्षा नसल्याचंही राज यावेळी म्हणाले.  

लोकसभा निवडणुकीनंतर राज यांनी निवडणूक आयुक्तांची भेटी घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली हाेती. परंतु त्यांच्या प्रतिक्रियेनंतर आमच्या मागणीचा विचार होईल, असं वाटत नसल्याचंही राज म्हणाले होते. 



हेही वाचा- 

'महाजनादेश' यात्रेला ‘शिवस्वराज्य’ यात्रेने उत्तर

शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा