Advertisement

शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री

येणारी विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना एकत्र मिळूनच लढणार आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढणार या चर्चा चुकीच्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री
SHARES

येणारी विधानसभा निवडणूक (Vidhan sabha election) भाजपा आणि शिवसेना एकत्र मिळूनच लढणार आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढणार या चर्चा चुकीच्या आहेत. पुढच्या १० ते १५ दिवसांत शिवसेना तसंच मित्रपक्षांसोबत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांनी सांगितलं. चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?  

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा (bjp)-शिवसेना (shiv sena) युती होणार की नाही? याबद्दल संशय निर्माण केला जात आहे. शिवाय भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार अशीही चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे.   

युती अभेद्य

भाजप आणि शिवसेनेत काही जागांवरून मतभेद असले, तरी येत्या १५ दिवसांत चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. या जागावाटपात काही प्रमाणात जागांची अदलाबदली देखील होऊ शकते. त्यानुसार भाजपच्या काही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतात, तर शिवसेनेच्या काही जागा भाजपाला द्याव्या लागू शकतील.  

बहुमताचा विक्रम मोडणार

भाजपा ही धर्मशाळा नसून कुणालाही पक्षात प्रवेश दिला जात नाही. केवळ जनतेसाठी चांगलं काम करणाऱ्यांनाच पक्षप्रवेश देण्यात आला आहे. एकवेळ अशी होती भाजपाचे कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. परंतु सद्यस्थितीत अनेकजण भाजपात येण्यास उत्सुक आहेत. भाजपा  विरोधी पक्षातील नेते भाजपात येत असल्याने भाजपाची ताकद वाढत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा युतीचंच सरकार सत्तेत येणार आहे. यावेळेस आमचाच बहुमताचा विक्रम आम्हाला मोडीत काढायचा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.  हेही वाचा-

भाजपाची मेगाभरती! शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश

मला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा