एसटीची 'शयनयान' लवकरच प्रवाशांच्या सेवेत

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

एसटीच्या प्रवाशांसाठी खूशखबर अाहे. लवकरच एसटीचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन शयनायन सुविधा असलेल्या बस गाड्यांचा लवकरच समावेश होणार अाहे.

'शयनयान' असंच या गा़डीचं नामकरण करण्यात आलं आहे. लवकरच ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. पुण्याच्या सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) या संस्थेकडून प्रमाणीत करुन घेण्यात आल्यानंतर ही गाडी रस्त्यावर धावण्यास सज्ज होईल.

१००० विनावातानुकूलीत गाड्या 

अत्याधुनिक वातानुकूलीत शिवशाही स्लिपर कोच गाड्यांबरोबरच एक हजार विनावातानुकूलीत शयनायन गाड्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा २० जानेवारी २०१८ ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. यानुसार पुण्यातील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत या गाड्यांची बांधणी सुरु आहे.

टप्याटप्याने होणार दाखल

दोन बाय एक अशा प्रकारची ३० शयनायन आसने या बसमध्ये असणार आहेत. सध्या एसटीच्या ६०० रातराणी बसेस धावत अाहेत. या गाड्यांच्या जागी टप्या टप्याने या नवीन शयनायन बसेस धावणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगला पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.


हेही वाचा -

रेल्वेची चिंधीगिरी, प्रवासी सुरक्षा वाऱ्यावरी

पाण्यातून मार्ग काढत विरारहून चर्चगेट लोकल रवाना...


 

पुढील बातमी
इतर बातम्या