Advertisement

पाण्यातून मार्ग काढत विरारहून चर्चगेट लोकल रवाना...


पाण्यातून मार्ग काढत विरारहून चर्चगेट लोकल रवाना...
SHARES

मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकातील ट्रॅकवर कमरेइतकं पाणी साचल्याने सलग २ दिवस या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र बुधवारी सकाळी ट्रॅकवरील पाण्याची पातळी घटल्याने विरारकडून काही लोकल धीम्या गतीने चर्चगेटच्या दिशेने सोडण्यात येत आहेत. यामुळे सकाळच्या सुमारास कामाला निघालेल्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळत आहे. याचजोडीने लांब पल्ल्याच्या गाड्यानांही विरार, वसई, नालासोपारा स्थानकांवर थांबा देण्यात येत आहे.


 


भाईंदर-चर्चगेट सुरळीत

तर, दुसऱ्या बाजूला पश्चिम रेल्वेच्या भाईंदर ते चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याने प्रवासी आपापल्या कार्यालयांकडे निघाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून विरार आणि भाईंदर दरम्यानची वाहतूक पूर्वपदावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. नालासोपाऱ्यात रुळांवर भरलेलं पाणी काढण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांची मदत घेण्यात येत आहे.


 


विरार ते भाईंदर हळूहळू

त्यानुसार विरारवरून सकाळपासून ६ लोकल ट्रेन चर्चगेटच्या दिशेने सोडण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही भाईंदरहून विरारच्या दिशेने एकही लोकल सोडण्यात आलेली नाही. नालासोपारा परिसरातील ट्रॅकवरंच पाणी पूर्णपणे न ओसरल्याने १० किमी. प्रति तास वेगाने या लोकल चालवण्यात येत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या देखील याच तऱ्हेने हळूहळू पुढे काढण्यात येत आहेत. तर विरार ते डहाणू लोकल सेवा सुरळीतपणे सुरू आहे.हेही वाचा-

लोकल सेवा बंद का पडते ? उच्च न्यायालयानं रेल्वेला घेतलं फैलावर

फक्त १० दिवसांतच महिनाभराएवढा पाऊसRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा