Advertisement

फक्त १० दिवसांतच महिनाभराएवढा पाऊस


फक्त १० दिवसांतच महिनाभराएवढा पाऊस
SHARES

गेल्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मंगळवारी चौथ्या दिवशीही मुंबई-ठाण्याला अक्षरश: धुऊन काढलं आहे. ठिकठिकाणी साचलेलं पाणी, वाहतुकीची कोंडी आणि रेल्वेच्या खोळंब्यामुळे निर्माण झालेली गर्दी यामुळं चाकरमान्यांची अक्षरश: झोप उडाली. 

गेले दहा दिवस मुंबईत ८४० मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली अाहे. विशेष म्हणजे दरवर्षी संपूर्ण जुलै महिन्यात सरासरी ८४०.७ मिमी पावसाची नोंद होते. त्यामुळे महिन्याभरातील पाऊस हा फक्त १० दिवसातच पडल्याचं दिसून येत आहे.


तिन्ही मार्गावरील गाड्या उशिरानं

मुसळधार पावसामुळे तिन्ही रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावत असल्यानं मुंबईतील अनेक स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कुलाबा परिसरात १६५.८ मिमी पावसाची तर सांताक्रुझ परिसरात१८४.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसंच खबरदारीचा उपाय म्हणून मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


मुंबईत गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसाचा जोर बुधवारपासून कमी होणार असून मंगळवारी ५.३० पर्यंत सांताक्रुज परिसरात १०६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सरासरी ८४०.७ मिमी पावसाची नोंद करण्यात येते. परंतु यंदा फक्त दहा दिवसातच जुलै महिन्यातील सरासरीचा आकडा पावसानं गाठला आहे.
 - महेश पालावत, हवामानतज्ज्ञ,  स्कायमेट



हेही वाचा -

लोकल सेवा बंद का पडते ? उच्च न्यायालयानं रेल्वेला घेतलं फैलावर

मालाडमध्ये शाळेची संरक्षक भिंत कोसळली



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा