ओला, उबर चालक-मालकांच्या मागण्यांवर बुधवारी निघणार तोडगा?

आपल्या विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालक-मालकांनी तीन दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. या संपामुळे जास्तीचे भाडे आकारून प्रवाशांची लूटमार केली जात आहे. त्यामुळे नियमितपणे या सुविधेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सार्वजनिक वाहनांनीच प्रवास करावा लागत आहे. मात्र तीन दिवसांपासून संपावर गेलेल्या चालक-मालकांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी बैठक होणार असून यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तरीही तोडगा नाही

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या अखत्यारीत ओला आणि उबरचे आंदोलन केलं जात आहे. सोमवारी उबरच्या कुर्ला येथील कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर देखील काहीच तोडगा न निघाल्याने मंगळवारपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

'या' आहेत प्रमुख मागण्या

ऑनलाइन टॅक्सीचे कमीत कमी भाडे १०० ते १५० रुपये दरम्यान असावं. प्रति किलोमीटरमागे १८ ते २३ रुपये भाडे असावं. कंपनीने नवीन वाहनं बंद करून सुरू असलेल्या वाहनांना समान काम द्यावं. अशाप्रकारच्या विविध मागण्या ओला-उबर चालक-मालकांकडून करण्यात येत आहेत.


हेही वाचा - 

आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीचेही होणार घरबसल्या बुकिंग!

पुढील बातमी
इतर बातम्या