संतप्त प्रवाशांनी 'डेक्कन क्वीन' तासभर रोखून धरली

पुण्याहून मुंबईला निघणारी 'डेक्कन क्वीन' एक्स्प्रेस संतप्त प्रवाशांनी सोमवारी सकाळी पुणे स्थानकावर तब्बल तासभर रोखून धरली. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे रेल्वे नियमित वेळापेक्षा 1 तास उशिराने मुंबईत दाखल झाली.


का रोखली एक्स्प्रेस?

'डेक्कन क्वीन एक्स्प्रेस'ने दररोज मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईला येत असतात. या एक्स्प्रेस गाडीचे हजारो पासधारक प्रवासी देखील आहेत. नेहमी फलाट क्रमांक एकवरुन निघणारी 'डेक्कन क्वीन' गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक 5 वरुन निघत आहे. प्रवाशांना याचा त्रास होत असल्याने त्याबाबतची वारंवार तक्रार देखील रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र, याची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने सोमवारी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. प्रवाशांनी 'डेक्कन क्वीन' रोखून धरत आपला निषेध व्यक्त केला. यामुळे दररोज सकाळी 7.15 वाजता निघणारी डेक्कन क्वीन सोमवारी आठच्या सुमारास रवाना झाली.


रेल्वे प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांपासूनच्या मागणीची कोणतीही दखल न घेतल्याने या गाडीच्या नियमित प्रवाशांनी सोमवारी सकाळी ठरवून हे आंदोलन केले. या आंदोलनानंतरही रेल्वे प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर पासधारक प्रवासी परत आंदोलन करतील.


वंदना गायकवाड, अध्यक्ष, प्रवासी संघटना

दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळी हा सगळा प्रकार घडत असल्यामुळे 'डेक्कन क्विन'च्या नियमित प्रवाशांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त केली.


हे देखील वाचा - 

'दख्खन'च्या राणीला 87 वर्ष पूर्ण


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या