'दख्खन'च्या राणीला 87 वर्ष पूर्ण

  Mumbai
  'दख्खन'च्या राणीला 87 वर्ष पूर्ण
  मुंबई  -  

  मुंबई आणि पुण्याला रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या 'दख्खनच्या राणी'ला गुरुवारी 87 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1 जून 1930 रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्विन’चा प्रवास आजही तसाच सुरू असून, मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे.

  मध्य रेल्वेने ‘डेक्कन क्वीन’च्या रूपाने भारतातील पहिली डिलक्स रेल्वे सुरू केली. ही भारतातील पहिली अतिजलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटीश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे 1943 मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे. रोज लाखोंच्या घरात या गाडीने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आहे. अनेक व्यापारी सकाळी पुण्यावरून मुबंईत येतात पुन्हा पुण्याला जातात ते याच गाडीने.

  विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी तर आहेच पण महिलांसाठी देखील विशेष डबे जोडण्यात आले आहेत. गाडीत स्वतंत्र भोजनाचा डब्बा असलेली ही पहिलीच गाडी आहे. ही गाडी पहिल्यांदा सात डब्यांची होती, नंतर 12 झाली आणि आता ही गाडी 17 डब्यांची आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.