सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

सरकारी इंधन कंपन्यानी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मुंबईमध्ये आता पेट्रोलचा दर ९४.१२ आणि डिझेल ८४.६३ रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७७.७३ रुपयांवर आले आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलचा भाव ६० डॉलर प्रती बॅरलपर्यंत गेला होता.फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती चारवेळा वाढल्या आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये पेट्रोलची किंमत २.५९ रुपये आणि डिझेलची किंमत २. ६१ रुपयांनी वाढली होती.

ऑइल मार्केटिंग कंपन्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवतात. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करतात. पेट्रोल-डिझेलचा दर तुम्ही SMS द्वारे माहिती करुन घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या कस्टमर RSP स्पेस पेट्रोल पंपाचा कोड लिहून ९२२४४९९२२४९  नंबरवर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ नंबरवर पाठवून किमती माहित करुन घेऊ शकता.


 

हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं


पुढील बातमी
इतर बातम्या