यंदा पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

दरवर्षी पावसाळ्यात जास्तीचा पाऊस झाल्यास दरडी कोसळ्यामुळं कोकण रेल्वे ठप्प होते. त्यामुळं कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी, कोकण रेल्वेनं सज्ज झाली आहे.

४० किलोमीटर वेगमर्यादा

पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी आणि खराब हवामानाचा फटका प्रवाशांना बसू नये, यासाठी कोकण रेल्वेनं ६३० मनुष्यबळ गस्तीसाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, पावसाळ्यात खराब हवामानामुळं चलकाला गाडी चालवताना अडथळे येतात. त्यामुळं मेल-एक्स्प्रेसना ताशी ४० किलोमीटर या वेगमर्यादेचं पालन करण्याची सूचना कोकण रेल्वेनं केली आहे.

धोकादायक मार्गांजवळ रुग्णवाहिका

कोकण रेल्वे मार्गावरील अतिसंवेदनशील ठिकाणी पावसाळ्यात २४ तास सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रवाशांना तातडीनं रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करण्यासाठी धोकादायक मार्गांजवळ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या गैर सोय होऊ नये, यासाठी बेलापूरसह रत्नागिरी इथं २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

निःशुल्क हेल्पलाइन क्रमांक

पावासाळ्यात कोकण मार्गावर प्रवास करतेवेळी प्रवाशांना पावसाळी वेळापत्रक, कोकण मार्गावरील धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचं वेळपत्रक आणि अन्य माहितीची गरज भासल्यास १३९ हा निःशुल्क हेल्पलाइन क्रमांक कोकण रेल्वेनं  उपलब्ध केला आहे.


हेही वाचा -

संपत्तीच्या वादातून गोवंडीत गोळीबार, दोन जखमी

गाडीच्या काचा फोडून लूट, सराईत आरोपी अटकेत


पुढील बातमी
इतर बातम्या