संपत्तीच्या वादातून गोवंडीत गोळीबार, दोन जखमी

मिर्झाचे आरोपी राजन आणि जुनेद सोबत खालापूरच्या जमिनीवरून वाद सुरू होते. याच वादातून दोघांना सुलतानचा काटा काढण्याचे ठरवले.

SHARE

संपत्तीच्या वादातून गोवंडीत अनोळखी व्यक्तींनी एकावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या गोळीबारीत अब्बास शेख, सुलतान मिर्झा हे जखमी झाले असून त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी देवनार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याचप्रमाणं, अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.


जमिनीवरून वाद

घाटकोपर मानखुर्द रोडच्या झाकीर हुसेन नगर परिसरातील लालूभाई कंपाऊडमध्ये सुलतान मिर्झा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. मिर्झाचे आरोपी राजन आणि जुनेदसोबत खालापूरच्या जमिनीवरून वाद सुरू होते. याच वादातून दोघांनी सुलतानचा काटा काढण्याचं ठरवलं. सोमवारी सुलतानच्या घरी तो त्याचे मित्र अरमान, जुबेर, अब्बास हे पहाटे ४ च्या सुमारात जमले होते. त्यावेळी ऑटो रिक्षा आणि स्कूटीवरून आलेल्या राजन आणि जुनेदनं मिर्झावर गोळीबार करत पळ काढला. या गोळीबारीत अब्बाजच्या पायाला गोळी लागली असून मिर्झाही किरकोळ जखमी झाला आहे.


संशयित ताब्यात

या दोघांना उपचारासाठी पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. तसंच, इतर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देवनार पोलिसांनी दिलीहेही वाचा -

मुंबईत तब्बल ४९९ इमारती असुरक्षित

नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेला अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या