नरेंद्र दाभोळकर हत्याप्रकरणी संजीव पुनाळेकर, विक्रम भावेला अटक

संजीव पुनाळेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. दाभोळकर हत्येतील आरोपींचे ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते.

SHARE
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने मुंबईतून हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना अटक केली आहे. दाभोळकर हत्येतील पुरावे नष्ट करणे आणि आरोपींना मार्गदर्शन केल्याचा आरोप पुनाळेकरांवर आहे. तर आरोपींना दाभोळकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप विक्रम भावेवर आहेत. 

आरोपींचेे वकील

संजीव पुनाळेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकील आहेत. दाभोळकर हत्येतील आरोपींचे ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. तर विक्रम भावे हा २००८ मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोटातील आरोपी आहे. 

पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर २० आॅगस्ट २०१३ साली दाभोळकरांची  गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नालासोपारा येथील घातपाताच्या कारवाईच्या तयारीत असलेल्या सचिन अंधुरे,  शरद काळसकर, शरद धोत्रे याला एटीएसने अटक केली. या तिघांच्या चौकशीतून दाभोळकरांच्याा हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे पुढे आल्यानंतर एटीएससह सीबीआयने आरोपींभोवती फास आवळण्यास सुरूवात केली. कालांतराने डाॅ दाभोळकर, कलबूर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आरोपींचा सहभाग समोर  आला. या प्रकरणात आता  संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांचा सहभाग पुढे आल्यानंतर सीबीआयने शनिवारी या दोघांना मुंबईतून अटक केली. 


सनातनकडून निषेध

या प्रकरणी सीबीआयचे अधिकारी अधिक तपास करत आहे. या दोघांच्या अटकेनंतर सनातन संस्थेने या दोघांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. सीबीआय दबावाच्या राजकारणापुढे झुकत ही कारवाई करत असल्याचे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांनी या कारवाईच्या निषेधार्थ काढलेल्या पत्रात म्हटलं आहे.हेही वाचा -

अंधेरीत चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या

पत्नीची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणारा पती अटकेत
संबंधित विषय
ताज्या बातम्या