SHARE

कौटुंबिक वादातून गोळ्या झाडून चुलत भावाची हत्या केल्याची घटना अंधेरीतील साकीनाका परिसरात शनिवारी घडली. यात इब्लिस खान याचा मृत्यू झाला असून हत्येनंतर आरोपी स्वतःहून पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


प्राॅपर्टीवरून वाद

साकीनाकाच्या नहार सोसायटीत मृत इब्लिक खान हे आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. त्याचे घरातल्या चुलत भावासोबत प्राॅपर्टीवरून वाद सुरू होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता की शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास इब्लिसच्या चुलत भावाने घरात घुसून इब्लिसवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर त्याने स्वतःच पोलिसांना हत्येची माहिती दिली. त्यानंतर साकीनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतलं. इब्लिसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. परवानाधारक पिस्तुलातून त्याने ही गोळी झाडल्याचं समजत आहे. पोलीस आरोपीची अधिक चौकशी करत आहेत.हेही वाचा-

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून २ जण जखमीसंबंधित विषय
ताज्या बातम्या