Advertisement

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून २ जण जखमी

घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

घाटकोपरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून २ जण जखमी
SHARES

मुंबईतील घाटकोपरमधील रमाबाई आंबेडकर नगर येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. लक्ष्मी शिवाजी कुटे (५७) आणि शिवाजी कुटे (६०) असं जखमींची नावं असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रमाबाई कॉलनीमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला. शनिवारी सकाळच्या सुमरास ही घटना घडली आहे. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.हेही वाचा -

पराभूत अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

'लाव रे फटाके'वरून मनसे कार्यकर्ते भडकलेRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा