Advertisement

'लाव रे फटाके'वरून मनसे कार्यकर्ते भडकले

मुंबईत महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानं सायन सर्कल येथे 'लाव रे फटाके, वाजव रे ढोल' असं वादग्रस्त पंच असलेलं होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यामुळं या होर्डिंगवरून भाजप आणि मनसेत पन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.

'लाव रे फटाके'वरून मनसे कार्यकर्ते भडकले
SHARES

लोकसभा निवडणुकीपूर्वी 'नरेंद्र मोदी व अमित शाह यांना राजकीय क्षितीजावरून हटवा’, 'त्यांना निवडून आणू नका' असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे राज्यभरात घेतलेल्या सभांमध्ये जनतेना आवाहन केलं होतं. परंतु, मतमोजणीवेळी मुंबईतील सर्व ६ जागांवर महायुतीचेचं उमेदवार आघाडीवर असल्यामुळं सर्व कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना दिसत होते. दरम्यान, महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानं सायन सर्कल येथे 'लाव रे फटाके, वाजव रे ढोल' असं वादग्रस्त पंच असलेलं होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यामुळं या होर्डिंगवरून भाजप आणि मनसेत पन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे.


राज ठाकरेंची प्रतिमा 

सायन सर्कल येथे लावलेल्या होर्डिंगवर 'लाव रे फटाके, वाजव रे ढोल' असं लिहिण्यात आलं आहे. तसंच, भाजप-शिवसेनेचे झेंडे असून, राज ठाकरेंची प्रतिमा भासावी अशा पद्धतीनं हात व चष्मा दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय 'समस्त जनता' असं लिहिण्यात आलं आहे.


डिवचण्यासाठी हे होर्डिंग

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचण्यासाठी हे होर्डिंग लावल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसंच, हे होर्डिंग काढून टाकण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे. त्याशिवाय, सायन सर्कल येथे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं कार्यालय असून हे होर्डिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलं असावं, असा दावा मनसेचे कार्यकर्ते करत आहेत.



हेही वाचा -

इंटरसिटी एक्स्प्रेसचा प्रवास अणखी होणार वेगवान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा