Advertisement

पराभूत अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे.

पराभूत अशोक चव्हाण देणार प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
SHARES

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. एवढंच नाही, तर ज्या राज्यांत काँग्रेसला अपेक्षीत यश मिळालं नाही, त्या सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यायला हवेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे.

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राज्यात अत्यंत खराब कामगिरी केली आहे. २०१४ मध्ये काँग्रेसला राज्यात केवळ २ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत जागा काही प्रमाणात वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात काँग्रेसला अवघी १ जागा मिळाली. तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या.

स्वत: चव्हाण यांना नांदेडमधून पराभावाला सामोरं जावं लागलं. भाजपाचे प्रतापराव चिखलीकर यांनी चव्हाण यांना ४० हजारहून अधिक मतांनी हरवलं.  हेही वाचा-

शिवसेना देशात पाचव्या स्थानीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा