Advertisement

शिवसेना देशात पाचव्या स्थानी

शिवसेनेने राज्यात २३ जागा लढवल्या होत्या. तर भाजपाने २५ जागा लढवल्या होत्या. शिवसेनेला यापैकी १८ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना देशात पाचव्या स्थानी
SHARES

महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाच्या महायुतीने काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चारत लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४१ जागांवर भगवा फडकवला. एवढंच नाही, तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ६ पैकी ६ जागा युतीच्या उमेदवारांनी ताब्यात घेतल्या. या दैदिप्यमान यशामुळे शिवसेना लोकसभेच्या सर्वाधिक जागा जिंकणारा देशातील ६ वा पक्ष ठरला आहे.

कोण कुठे?

लोकसभा निवडणुकीच्या एकूण ५४२ जागांपैकी सर्वाधिक ३०३ जागा मिळवत भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सगल दुसऱ्यांदा बहुमत मिळवत भाजपाने काँग्रेसचा रेकाॅर्डही मोडीत काढला आहे. दुसऱ्या स्थानी पराभवाची नामुश्की सहन करणाऱ्या काँग्रेसचा क्रमांक लागतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या. यंदा काँग्रेसच्या वाट्याला ५२ जागा आल्या असून त्यांची स्थिती किंचित सुधारली आहे. परंतु काँग्रेसला या निवडणुकीत १७ राज्यांमध्ये साधा भोपळाही फोडता आलेला नाही. 

महाराष्ट्रात जैसे थे

तिसऱ्या स्थानी द्रमुक असून या पक्षाला २३ जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानी तृणमूल काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी २२ जागा मिळाल्या आहेत. तर पाचव्या स्थानी शिवसेना आहे. शिवसेनेला महाराष्ट्रात एकूण १८ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेनेने राज्यात २३ जागा लढवल्या होत्या. तर भाजपाने २५ जागा लढवल्या होत्या. यापैकी भाजपाने २३ जागा जिंकल्या आहेत. हेही वाचा-

म्हणून भाजपा-शिवसेना युतीला मुंबईत यश मिळालं

कल्याण, भिवंडी, ठाणे आणि पालघरमध्ये महायुतीचाच विजयसंबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा