Advertisement

कल्याण, भिवंडी, ठाणे आणि पालघरमध्ये महायुतीचाच विजय

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणं कल्याण, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये देखील महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

कल्याण, भिवंडी, ठाणे आणि पालघरमध्ये महायुतीचाच विजय
SHARES

यंदाच्या लोकसभा निवडणूकीत मुंबईतील सहा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्याचप्रमाणं कल्याण, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये देखील महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याणमधून शिवसेनेचे  उमेदवार श्रीकांत शिंदे, ठाण्यातून राजन विचारे, पालघरमधून राजेद्र गावित आणि भिवंडीतून भाजपचे उमेदवार कपील पाटील विजयी झाले आहेत.


महायुतीचे उमेदवार विजयी

कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे (,५९,७२३) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील (,१५,३८०) यांचा (,४४,३४३) मतांनी पराभव केला आहे. अन्य पक्षांना ६५ हजार ५६२ मत मिळाली आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राज विचारे (,४०,९६९) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे (,२८,८२४) यांचा (,१२,१४५) मतांनी पराभव केला आहे. तसंच अन्य पक्षांना ४७ हजार ४३२ मतं मिळाली आहे.

भिवंडी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कपील पाटील (,२३,५८३) यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश तेवरे (,२८,८२४) यांचा (,९४,७५९) मतांनी पराभव केला आहे. अन्य पक्षांना ५१ हजार ४५५ मतं मिळाली आहेत. पालघर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित (,८०,४७९) यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश तावरे (,९१,५९६) यांचा (८८,८८६) मतांनी पराभव केला आहे. अन्य पक्षांना ३९ हजार ९३२ मतं मिळाली आहेत.



हेही वाचा -

बघा, मुंबईत कोणाला किती मतं मिळाली?

लोकसभा निवडणुकीत 'नोटा' पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा