Advertisement

लोकसभा निवडणुकीत 'नोटा' पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ

यंदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांबाबत नापंसती दर्शवत अनेक मतदारांनी 'नोटा'चा (वरील पैकी कोणीही नाही) पर्याय निवडला आहे.

लोकसभा निवडणुकीत 'नोटा' पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत वाढ
SHARES

यंदा लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांबाबत नापंसती दर्शवत अनेक मतदारांनी 'नोटा'चा (वरील पैकी कोणीही नाही) पर्याय निवडला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत सर्वच उमेदवारांबाबत नापसंती दर्शवणाऱ्या मतदारांची संख्या मुंबईसह अनेक ठिकाणी वाढली आहे. प्रत्येक ठिकाणी १० हजारांपेक्षा अधिक मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारल्याचं चित्र मतमोजणीदरम्यान पाहायला मिळालं असून, पालघरमध्ये सर्वाधिक म्हणजे २९ हजारपेक्षा अधिक मतदारांनी 'नोटा'चा पर्याय वापरला आहे.


१० हजारांपेक्षा अधिक

यंदाच्या निवडणुकीत 'नोटा' हा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या वाढली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 'नोटा'चा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या ४ ते ८ हजारांनी वाढली आहे. मुंबई महानगरातील १० मतदारसंघांपैकी उत्तर-मध्य मुंबई आणि कल्याण हे २ मतदारसंघ वगळे असता, उर्वरित ८ मतदारसंघांमध्ये 'नोटा'चा पर्याय निवडणाऱ्या मतदारांची संख्या ही १० हजारांपेक्षा अधिक आहे.


२०१४च्या निवडणूकीत पर्याय

२०१४च्या निवडणुकीवेळी ‘नोटा’(वरील पैकी कोणीही नाही) हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. मुंबईकरांनी मागील निवडणुकीत 'नोटा'चा पर्याय वापरला होता. दक्षिण, उत्तर, वायव्य, दक्षिण मुंबई मतदारसंघात ८ ते १० हजार मतदारांनी, तर पालघरमध्ये साधारण २१ हजार मतदारांनी 'नोटा'चा पर्याय वापरला होता.


'नोटा' पर्याय निवडणारे मतदार


मतदारसंघ
नोटाचे वापरकर्ते
टक्केवारी
पालघर
२९४६३
.४५
दक्षिण मुंबई
१४९१२
.८८
दक्षिण-मध्य मुंबई
१३७९५
.७३
वायव्य मुंबई
१३३३०
.९१
ठाणे
१३०३३
.
भिवंडी
१२७८७
.६१
ईशान्य मुंबई
१२४४६
.३७
उत्तर मुंबई
११५६५
.२२
उत्तर-मध्य मुंबई
९९५५
.१९
कल्याण
८८०२
.५९
हेही वाचा -

'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे

'पराभवानंतर कॉग्रेससोबतच काम करीन' - उर्मिला मातोंडकरRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement