आंदोलनकर्त्या प्रशिक्षणार्थींवर गुन्ह्याची नोंद, दोघांना अटक

आंदोलनाची कुठलीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रवाशांना वेठीस धरून सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी ८०० ते १ हजार जणांच्या जमाविरोधात गुन्हा नोंदवून दादर पोलिसांनी २ विद्यार्थ्यांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त समाधान पवार यांनी दिली.

कुणाला अटक?

अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचं नाव आतिशकुमार साहू आणि गोकुळ लोहारे असं आहे. आंदोलनकर्त्यांवर भादंवि कलम ३०७ अंतर्गत दंगलप्रकरणी आणि रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस, विद्यार्थी जखमी

तब्बल साडेतीन ते ४ तास रेलरोको करणाऱ्या रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी घेतलेल्या या पावित्र्याला प्रतिउत्तर देताना प्रशिक्षणार्थींनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत रेल्वेचे १० पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींमध्ये काही महिला पोलिस शिपायांचाही समावेश आहे. तर पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये ३ हून अधिक प्रशिक्षणार्थीही जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या पोलिस आणि विद्यार्थ्यांवर दादरच्या 'वन रुपी क्लिनिक'सह नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.


हेही वाचा-

रेल्वे प्रशिक्षणार्थींना मनसेची साथ, शिष्टमंडळ दिल्लीला जाणार

चाकरमान्यांसाठी बेस्ट आली धावून, बेस्टने सोडल्या ११५ गाड्या


पुढील बातमी
इतर बातम्या