पश्चिम रेल्वेवर तिसऱ्या डोळ्याची नजर वाढली

मुंबईच्या तिन्ही मार्गावरील लोकलमधून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास असूनही या प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे. लोकलमध्ये चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईच्या तिन्ही मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं उभारण्याचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्यात पश्चिम उपनगरातील विविध स्थानक आणि परिसरात २८१५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिस गुन्हेगारांवर लक्ष ठेवणार आहेत.

अद्ययावत कॅमेरे

धावत्या लोकलमध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार वा इतर गुन्ह्यांमुळे रेल्वेतील प्रवशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे स्थानकांवर लावण्यात आलेल्या १०८० कॅमेऱ्यांच्या जागी टप्याटप्याने नवीन अद्ययावत कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

विरारपुढेही कॅमेरे

विशेष म्हणजे राज्य सरकारच्या या प्रस्तावाला मंजुरी देत रेल्वे बोर्डानेही १७३५ कॅमरे देऊ केले आहेत. त्यामुळे आता विरारपुढील सफाळे, वैतरणा, केळवे रोड यांसारख्या स्थानकातही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हे कॅमरे अद्ययावत आणि उत्तम दर्जाचे असून रात्रीच्या अंधारातही या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांवर नजर ठेवता येणार आहे.


हेही वाचा-

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तिन्ही मार्गावर धावणार विशेष लोकल

ठाणे मेट्रो आता गायमुखपर्यंत; कासारवडवली ते गायमुख मेट्रो-४ अ ला हिरवा कंदील


पुढील बातमी
इतर बातम्या