मुंबईचं अर्थचक्र रुळावर, मात्र रिक्षा, टॅक्सी चालकांवरील आर्थिक संकट कायम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले असून, त्यामुळं आर्थिक संकट ओढावलं आहे. अनेकांवर कर्जाचा बोजा असल्यानं यातून मार्ग कसा काढायचा ही चिंता सतावत आहे. अशातच हातावर पोट असलेल्यांचीही परिस्थिती दयनीय झाली आहे. यामध्ये रिक्षा व टॅक्सी (auto rickshaw and taxi) चालकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सींकडं प्रवाशांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे.

आर्थिक स्थिती बिकट झाल्यानं वाहन कर्जाचा बोजा असलेल्या चालकाला कर्ज भरणं कठीण झालं आहे. त्याशिवाय, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या कुटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस, कुर्ला, दादर, ठाणे, चर्चगेट, मुंबई सेंट्रल अशा अनेक रेल्वे स्थानकांवर वाहनांची पार्किंग आणि अशा मोठ्या स्थानकांवरून रिक्षा, टॅक्सी चालकांचा दिवसभरातील प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय चालतो.

मागील ७ महिन्यांपासून रेल्वे (railway) सेवाच बंद असल्यानं, अनेक रिक्षा, टॅक्सी चालका प्रवासी वाहतूक बंद करून इतर व्यवसायाच्या शोधात आहेत. लॉकडाऊनपूर्वी ८ तासात सुमारे ६०० रूपये रिक्षा चालकांचा व्यवसाय व्हायचा मात्र, सध्यस्थितीत निम्माही होत नसल्याचं चित्र आहे. शाळा, महाविद्यालय, थिएटर, रेल्वे, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या बंद आहे. तर कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडत नाही. त्यातच बेस्टनं ५ रूपयांची तिकीट केल्यानं नागरिक रिक्षा प्रवास टाळून बेस्टनं अधिक प्रवास करत आहे. 


हेही वाचा -

NDRF आणि NSSचं कोरोनाव्हारस विरोधात जनजागृती अभियान

MPSC ची नोव्हेंबरमधील परीक्षाही पुढे ढकलली
पुढील बातमी
इतर बातम्या