रेल्वे स्थानकात अवतरला सांताक्लॉज

नाताळ आल्यावर सर्वांच्या मुखी एकाचीच चर्चा असते ती म्हणजे 'सांताक्लॉज'ची. सांताक्लॉज काय गिफ्ट देणार याची उत्सूकता चिमुरड्यांसह मोठ्यांना असते. परंतू, यंदा हा सांताक्लॉज जनजागृतीच्या माध्यमातून गिफ्ट देतो आहे. त्यासाठी हा सांताक्लॉज रेल्वे स्थानकात अवतरला  होता. रेल्वे प्रवासाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात सोमवारी सांताक्लॉजचं आगमन झालं होतं.

उपक्रमाचं आयोजन

नाताळनिमित्त रेल्वे पोलिसांतर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रेल्वे सुरक्षेबाबत माहिती देणारे फलक हातात घेऊन सांताक्लॉज रेल्वे प्लेटफॉर्म, तसेच रेल्वे ब्रिजवर उभा होता. रेल्वे ट्रॅक ओलांडू नका, नेहमी रेल्वे फूटओवरब्रिजचा उपयोग करा, रेल्वेमध्ये चढताना व उतरताना दरवाजाच्या डाव्या बाजूचा उपयोग करावा, दरवाजाला लटकून प्रवास करू नका, रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी १८२ क्रमांकावर फोन करावा. अशा घोषणा रेल्वे पोलिसांमार्फत देण्यात येत होत्या.

प्रवाशांचं लक्ष

रेल्वे सुरक्षेबाबत सांताक्लॉज जनजागृती करत असल्यानं प्रवाशांचं लक्ष वेधलं जात होतं. त्यावेळी रेल्वेचे नियम न पाळल्यास कोणत्या प्रकारची कारवाई होऊ शकते, याबद्दल प्रवाशांना माहिती देण्यात आली व योग्य उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे जनजागृती करण्यासाठी 'यम' रेल्वे स्थानक परिसरात अवतरला होता. त्यावेळी त्यानं अनेक प्रवाशांना सुरक्षेबाबत धडे दिले तर काहिंना उचलून नेलं.


हेही वाचा -

अरुण गवळीची मुलगी 'ह्या' अभिनेत्याशी करणार लग्न

उड्डाणपुलाहून दुचाकी पडली, तरुणाचा जागीच मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या