अरुण गवळीची मुलगी 'ह्या' अभिनेत्याशी करणार लग्न

गँगस्टर व माजी आमदार अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा साखरपुडा नुकताच पार पडला.

SHARE

गँगस्टर व माजी आमदार अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी हिचा साखरपुडा नुकताच पार पडला. अभिनेता अक्षय वाघमारेबरोबर योगिताचं लग्न होणार आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. 

अक्षयने बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप आदी मराठी चित्रपटात काम केलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेला 'फत्तेशिकस्त' या चित्रपटात अक्षय सरदार कोयाजी नाईक बांदल यांच्या भूमिकेत दिसला होता. अक्षय आणि योगिता गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. याबाबत अक्षय म्हणाला की,  आमच्यात मैत्री होती. आमची मैत्री कुटुंबीयांनाही माहिती होती. त्यामुळं घरच्यांनीच लग्न करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर आम्ही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषिकेश देशपांडे या कलाकारांनी हजेरी लावली. दोघेही फेब्रुवारी २०२० मध्ये लग्न करणार आहेत. महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी योगिता काम करते. तर काही चित्रपटांची निर्मिती देखील तिनं केली आहे.हेही वाचा -

स्वप्नपूर्तीसाठी एका आईनं घेतलेला 'पंगा'

कमाईत अक्षय कुमारने मागे टाकलं सलमानला, 'इतकी' आहे अक्षयची कमाई
संबंधित विषय
ताज्या बातम्या