Advertisement

स्वप्नपूर्तीसाठी एका आईनं घेतलेला 'पंगा'

कंगना पुन्हा एकदा 'पंगा' या आगामी चित्रपटात आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'पंगा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

स्वप्नपूर्तीसाठी एका आईनं घेतलेला 'पंगा'
SHARES

बॉलिवूडची क्वीन कंगना नेहमीच वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसते. मणिकर्णिकामध्ये तिनं आईची भूमिका साकारली होती. आता ती पुन्हा एकदा 'पंगा' या आगामी चित्रपटात आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'पंगा' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.


'अशी' आहे कहाणी

'पंगा' सिनेमात कंगना जया निगम ही व्यक्तिरेखा साकारत आहे. एका कबड्डीपटूच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. जया ही अव्वल कबड्डीपटू तर असतेच. शिवाय २०१० साली भारतीय कबड्डी टीमची कॅप्टन असते. पण लग्न आणि त्यानंतर एका मुलाची आई या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तिला कबड्डीपटू म्हणून करिअर करणं कठिण असतं. त्यामुळे ती रेल्वे स्टेशन काउंटरवर तिकीट इश्यू करणारी कर्मचारी म्हणून काम करते

पण जयाची स्वप्न वेगळी असतात. एका मुलाची आई झाली म्हणून काय झालं? अजूनही मी कबड्डीपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकते, याची जाणीव तिला होते. नशीबानं स्वत:चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला दुसरी संधी मिळते. पुन्हा एकदा ती जोमानं कबड्डीची अव्वल खेळाडू बनण्यासाठी संघर्ष करते. जयाचा छोटा मुलगा आणि पती तिच्या निर्णयाला पाठिंबा देतात. जयाची म्हणण्यापेक्षा प्रेत्येक स्त्रीच्या संघर्षाची कहाणी यात दाखवण्यात आली आहे.

चित्रपटाचे हटके प्रमोशन

'पंगा'चा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना व्हीटी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिनं चित्रपटातील आपले कॅरेक्टर रीक्रिएट केलं.

कंगनाच्या आगामी चित्रपटाबद्दल तिची बहिण रंगोली चंदेलनं एक पोस्टर काही दिवसांपूर्वी शेअर केले होते. फोटो शेअर करताना रंगोलीनं लिहिलं की, कंगना म्हणते 'जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला आईची भूमिका साकारण्यासाठी विचारण्यात येतं तेव्हा तो तिचा अपमान असतो'. पंरतू 'मणिकर्णिका'मध्ये आईची भूमिका यशस्वीरित्या साकारल्यानंतर कंगना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आई साकारताना दिसणार आहे. यशाच्या शिखरावर असणारी अभिनेत्री आईची भूमिका साकारत आहे. हा नवा भारत आहे; ज्याला 'पंगा' घ्यायला आवडतं, असं रंगोलीनं म्हटलं होतं.

'पंगा' हा चित्रपटत येत्या २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी करणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात रिचा चड्ढा, नीना गुप्ता, जस्सी गिल आणि पंकज त्रिपाठीही मुख्य भूमिकेत असणार आहेत.



हेही वाचा

'तारक मेहता का उल्टा चष्मा' आता मराठीतही

कमाईत अक्षय कुमारने मागे टाकलं सलमानला, 'इतकी' आहे अक्षयची कमाई


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा