सायन उड्डाणपूल २७ फेब्रुवारीपासून ५ दिवस बंद

दुरुस्तीच्या कामासाठी सायन उड्डाणपूल (Sion Flyover) २७ फेब्रुवारीपासून पाच दिवस बंद राहणार आहे. गुरूवारी २७ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवार २ मार्च सकाळी ७ वाजेपर्यंत सायन उड्डाणपूल बंद राहील. 

 एमएसआरडीसीने (msrdc) सायन उड्डाणपूल (Sion Flyover) १९९९ मध्ये बांधला. २०१७ मध्ये आयआयटी बॉम्बेने उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करून उड्डाणपुलाचे बेअरिंग्ज (Bearings) बदलण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आता सायन उड्डाणपुलाच्या बेअरिंग्ज बदलण्याचं काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने हे काम सुरू आहे. या कामासाठी उड्डाणपूलावरील वाहतूक पूर्ण बंद असेल.  या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील दुरुस्तीचे काम १४ ते १८  फेब्रुवारीदरम्यान चालले.  दुसऱ्या टप्प्यात २७ फेब्रुवारीपासून उड्डाणपूल पाच दिवस बंद राहणार आहे. २ मार्चपर्यंत हे काम चालेल. 

 मुंबईला ठाणे, वाशी आणि इतर उपनगरांशी जोडणारा सायन उड्डाणपूल (Sion Flyover) हा दक्षिण मुंबईतील एक महत्वाचा उड्डाणपूल आहे.  या उड्डाणपुलावरून रोज शेकडो वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे आता काही दिवसांसाठी हा पूल बंद राहणार असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. 

या दिवशी असतील ब्लॉक

२० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी

२७ फेब्रुवारी ते २ मार्च

५ मार्च ते ९ मार्च

१२ मार्च ते १६ मार्च

१९ मार्च ते २३ मार्च

२६ मार्च ते ३० मार्च

२ एप्रिल ते ६ एप्रिल


हेही वाचा -

'असे' आहेत, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलचे नवे दर

बोरिवलीत दुभाजकांवर एलईडी लाईट्स, पालिकेची नावीन्यपूर्ण योजना


पुढील बातमी
इतर बातम्या