Advertisement

बोरिवलीत दुभाजकांवर एलईडी लाईट्स, पालिकेची नावीन्यपूर्ण योजना

एलईडी दुभाजकाने बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) ही पहिली नावीन्यपूर्ण योजना आहे.

बोरिवलीत दुभाजकांवर एलईडी लाईट्स, पालिकेची नावीन्यपूर्ण योजना
SHARES

बोरिवली रेल्वे स्थानक ( Borivali railway stations ) पश्चिम ते गोराई (Gorai) या सात ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांवर (dividers) एलईडी लाईट्स (LED lights) बसवण्यात आल्या आहेत. एलईडी दुभाजकाने बोरिवलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) ही पहिली नावीन्यपूर्ण योजना आहे. 

भविष्यात मुंबईतील रस्त्यांच्या दुभाजकावर मुंबईकरांना एलईडी लाईट्स (LED lights) दिसतील. प्रायोगिक तत्त्वावर एलईडी दुभाजक (dividers) बोरिवलीमध्ये प्रथम बसवण्यात आले आहेत. हळूहळू मुंबईत सर्व ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल. आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक पालिका आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली सहा.अभि.परिरक्षण याची राजेश अक्रे यांनी ही योजना बोरिवलीत राबवली आहे. ही योजना आर मध्य वॉर्डमध्ये अन्य भागात सुरू करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात जानेवारीत पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि २४ सहाय्यक आयुक्त यांच्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजना राबवण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार बोरिवली रेल्वे स्थानक पश्चिम ते गोराई या सात ठिकाणी असलेल्या रस्त्यांच्या दुभाजकांवर एलईडी लाईट्स (LED lights) बसवण्यात आल्या आहेत.  मुंबई महानगरपालिकेची (Mumbai Municipal Corporation) ही पाहिली योजना असल्याची माहिती डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली. एलईडी लाईट्समुळे आता रात्रीच्या वेळी दुभाजकावर अपघात होणार नाही, मात्र नागरिकांनी वाहने चालवताना येथील एलईडी लाईट्सची काळजी घ्यावी, असं आवाहन डॉ. कापसे यांनी केलं आहे. 



हेही वाचा -

कुलाबामध्ये सुका कचरा विलगीकरण केंद्र होणार

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा