COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

लोअर परळ (Lower Parel) येथे बावला मस्जिद समोर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (Dumper) तिघांना चिरडलं. या अपघातात दोघे जागीच ठार (death) झाले.

लोअर परळ येथे डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
SHARES

लोअर परळ (Lower Parel) येथे बावला मस्जिद समोर भरधाव वेगाने आलेल्या डंपरने (Dumper) तिघांना चिरडलं. या अपघातात दोघे जागीच ठार (death) झाले. तर एक गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री हा अपघात (accident) झाला. अपघातानंतर स्थानिकांची या ठिकाणी मोठी गर्दी जमली. दारूच्या नशेतील चालकांचं डंपरवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. 


लोअर परळ (Lower Parel) येथे ना. म. जोशी मार्गावरील बावला मशीदजवळील मोनोरेल स्टेशनच्या (Monorail Station) पुलाखाली हा अपघात (accident) झाला.  भरधाव वेगाने या पुलाखालून डंपर जात होता. यावेळी दारूच्या नशेतील डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटले. डंपरने अनेक गाड्यांना ठोकर दिली. डंपरच्या धडकेत एका टॅक्सीला नुकसान झाले तर एका कारचा चक्काचूर झाला. त्यानंतरही डंपरचालक थांबला नाही. त्यानेे तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावरून चालणाऱ्या तिघा जणांना डंपरखाली चिरडले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण एगंभीर जखमी झाला आहे. जखमीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात कल्याण येथे राहणारे संजय सखाराम पवार (वय ५९) यांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या व्यक्तिची ओळख अद्याप पटली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मोनोरेल  (Monorail) पुलाखाली एकच गर्दी केली. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडीही झाली. या अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसंच पोलिसांना तात्काळ घटनास्थळी पाचारण केलं. हेही वाचा -

या पोलिस अधिकाऱ्याचे कुख्यात गुंडाशी संबध

होमगार्डची सुरक्षा लवकरच पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा