Advertisement

'असे' आहेत, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलचे नवे दर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल महागणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर (New Rate) लागू होणार आहेत.

'असे' आहेत, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलचे नवे दर
SHARES

मुंबईहून पुण्याच्या दिशेनं व पुण्याहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Express Way) हा मार्ग महत्वाचा आहे. या एक्स्प्रेस वेवरून प्रवास करण्यासाठी प्रवाशाना टोल (Toll) भरावा लागतो. मात्र, या मार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या एक्स्प्रेस वेवरील टोल महागणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर (New Rate) लागू होणार आहेत.

महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं (MSRDC) टोलचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, या टोलसाठी नव्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कारसाठी सध्या २३० रुपये मोजावे लागत आहे. मात्र, १ एप्रिलपासून म्हणजेच नव्या दरानुसार, २७० रुपये मोजावे लागणार आहेत.

पुढील १५ वर्षांसाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचा वापर करण्यासाठी टोल आकारला जाणार आहे. यासाठी एमएसआरडीसीनं नव्या कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. याआधी २०१७ मध्ये मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल १८ टक्क्यांनी महागले होते. दर ३ वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलच्या दरात १८ टक्के वाढ होणार असल्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागानं २००४ मध्येच काढली होती. त्यानुसार दरवाढ करण्यात येते.

टोलचे नवे दर

  • कारसाठी सध्याचा टोल आहे २३० रुपये असून, १ एप्रिलपासून हा दर २७० रुपये होणार आहे.
  • मिनीबससाठी सध्या ३५५ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ४२० रुपये होणार आहे.
  • बससाठी सध्या ६७५ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ७९७ रुपये होणार आहे.
  • ट्रक टू अॅक्सलसाठी सध्या ४९३ रुपये टोल आकारला जात असून, १ एप्रिलपासून हा टोल ५८० रुपये होणार आहे.
  • क्रेन किंवा तत्सम अवजड वाहने आणि टू अॅक्सलपेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना सध्या १५५५ रुपये टोल आकारला जात असून, हा टोल १ एप्रिलपासून १८३५ रुपये इतका आकारला जाणार आहे.



हेही वाचा -

वांद्रे-वरळी सीलिंकवरील फास्टॅगला चांगला प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा : विकास धारिया, आयेशा साजिद यांना विजेतेपद



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा