Advertisement

वांद्रे-वरळी सीलिंकवरील फास्टॅगला चांगला प्रतिसाद

वांद्रे-वरळी सीलिंकवरील (Bandra-Worli Sea-link) फास्टॅगच्या व्यवहारात महिनाभरात ७ हजारांनी वाढ झाली आहे.

वांद्रे-वरळी सीलिंकवरील फास्टॅगला चांगला प्रतिसाद
SHARES

वांद्रे-वरळी सीलिंकवरील (Bandra-Worli Sea-link) फास्टॅगच्या व्यवहारात महिनाभरात ७ हजारांनी वाढ झाली आहे. सी-लिंकवर टोलच्या व्यवहारासाठी फास्टॅगचा (Fastag) वापर होत आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकवर मागील महिन्यात २४ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. फास्टॅगपूर्वी ईटीसी मार्गिकेवर दिवसाला सुमारे २ हजार व्यवहार होत असत. फास्टॅग यंत्रणा कार्यरत केल्यानंतर अनेक वाहनचालकांनी फास्टॅगला पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईच्या वेशीवरील इतर ५ टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणेसाठी लागणारे सेन्सर (Sensor) करोनामुळं (Cororna Virus) थायलंडमधून येण्यास विलंब होत असल्यामुळं त्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. २ दिवसांपूर्वी घेतलेल्या आढाव्यामध्ये वांद्रे-वरळी सी लिंकवर (Bandra-Worli Sea-link) दिवसाला एकूण ९ हजार ३११ व्यवहार हे फास्टॅगच्या माध्यमातून झाल्याचं समजतं

वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका दिवसात टोल नाक्यावर सुमारे ४० हजार व्यवहार होत आहेत. तसंच, फास्टॅगला प्रतिसाद वाढत असून, साधारण एक चतुर्थाश व्यवहारांसाठी फास्टॅगचा वापर होत आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर सध्या पहिल्या टप्प्यात सहा मार्गिका फास्टॅगसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी दहिसर (पश्चिम द्रुतगती मार्ग), मुलुंड (लाल बहादूर शास्त्री मार्ग), मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), ऐरोली (मुलुंड-ऐरोली मार्ग) आणि वाशी (शीव-पनवेल मार्ग) या ५ ठिकाणी पथकर नाके आहेत. या सर्व ठिकाणी फास्टॅग यंत्रणेची चाचणी सुरू आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात नाक्यांवरील काही मार्गिकाच फास्टॅगसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रतिसादानुसार मार्गिकांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. फास्टॅग सुविधा केवळ राष्ट्रीय महामार्गासाठी (National Highway) असली तरी वाहतूकदारांच्या काही संघटनांनीदेखील मुंबईच्या पथकर नाक्यांवर फास्टॅग यंत्रणा सुरू करण्याची मागणी महामंडळाकडं केली आहे.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा