अखेर एसटी भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, शुक्रवारपासून प्रवाशांना भुर्दंड

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • परिवहन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) गुरुवारी १४ जूनच्या मध्यरात्री होणारी १८ टक्क्यांची भाडेवाढ लांबल्यानं एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला होता. पण अवघ्या काही तासातच प्रवाशांच्या अानंदावर विरजण पडलं अाहे. एसटी प्राधिकरणानं शुक्रवारी दुपारी १८ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून शुक्रवारी १५ जूनच्या मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अाता शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच भाडेवाढ लागू होईल, अशी माहिती एसटी प्रशासनानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारं दिली आहे.

मंजुरी घेतली नव्हती

इंधन दरवाढीमुळं एसटीला होणारा ४७० कोटींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी १४ जूनच्या मध्यरात्रीपासून १८ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटीनं घेतला. पण गुरुवारी मध्यरात्री ही भाडेवाढ झालीच नाही. त्यामुळं एसटी प्रवाशांना दिलासा मिळाला. ही भाडेवाढ का झाली नाही, याची विचारणा एसटी प्रशासनाकडे केली असता भाडेवाढ लागू करण्याचा दिवस उजाडला तरी एसटी प्रशासनानं १८ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला एसटी प्राधिकरणाकडून मंजुरीच घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड

एकीकडे भाडेवाढ लागू होणार असल्याची जोरदार चर्चा गुरुवारी असतानाही एसटीनं भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी घेतली की नाही, याची माहितीही प्रवाशांना वा प्रसारमाध्यांना दिली नाही. यावरून एसटीच्या कारभारावर मोठी टीका झाली. या टीकेनंतर अखेर खडबडून जागे आलेल्या एसटीनं शुक्रवारी जोरदार हालचाली करत दुपारी यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रवाशांना १८ टक्के अधिक भाडं द्यावं लागणार आहे.

असे असतील नवे दर


हेही वाचा -

प्रवाशांना दिलासा, एसटी भाडेवाढ लांबणीवर

Exclusive: वेतनवाढ नकोय तर लिहून द्या! दिवाकर रावते

पुढील बातमी
इतर बातम्या