एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार 'इतकी' कपात

एसटी महामंडळाच्या बसनं प्रवाशांना राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास करता येतो. या एसटी बसला प्रवाशांची मोठी मागणी आहे. मात्र अस असतानाही राज्यातील एसटीच्या विविध आगारांचं उत्पन्न घटल्यांची माहिती समोर येत आहे. उत्पन्न नसल्यानं महामंडळाला आर्थिक डबघाईला सामोरं जावं लागत आहे. डिझेल खरेदीसाठी काही आगारांकडे पैसे नसल्याचं समजतं. तसंच, पैसे उभे करण्यासाठी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पगाराची कपात केली जात आहे.

वेतनात कपात

ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा ४० %, साताऱ्यातील कर्मचाऱ्यांचा २० %, सिंधुदुर्गातील कर्मचाऱ्यांचा ३० %, अकोल्यातील कर्मचाऱ्यांचा ७० % आणि रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांचा १९ % वेतनात कपात करण्यात आली आहे. तसंच, उस्मानाबाद, गडचिरोली, नांदेड, नाशिक नं१ डेपो येथील कर्मचाऱ्यांचा अद्याप पगारच झालेला नाही.

वेतन देण्याची मागणी

आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत असल्यानं एसटी कामगार संघटनांनी महामंडळाकडं तत्काळ सर्व वेतन देण्याची मागणी केली आहे. १०० टक्के वेतन न मिळाल्यास एसटी कामगार संघटनेनं आंदोलन छेडण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळं प्रवाशांना कर्मचाऱ्यांना आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे.


हेही वाचा -

वायुप्रदूषण टाळण्यासाठी बेस्ट बसचा प्रवास करावा- किशोरी पेडणेकर

विलंब शुल्कासह आयकर रिटर्न सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत


पुढील बातमी
इतर बातम्या