मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर डिसेंबरमध्ये ७२ तासांचा बंद

मध्ये रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर डिसेंबरमध्ये मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक असेल.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) आणि मध्य रेल्वे शहराच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर १८ तासांपासून ते ७२ तासांपर्यंत रेल्वे ब्लॉक घेणार आहेत.

नवीन रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यासाठी आणि उर्वरित बांधकाम हाती घेण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यानच्या विविध रेल्वे विभागांवर रेल्वे ब्लॉक घेतले जातील. ७२ तासांचा मोठा रेल्वे ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे बोर्डाची परवानगी आवश्यक आहे.

MRVC च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, “ब्लॉकसाठी मध्य रेल्वेशी चर्चा झाली आहे आणि परवानग्या मागवण्यात आल्या आहेत.”

मध्य रेल्वेनं सांगितलं आहे की, प्रवाशांची कमीत कमी गैरसोय होईल आणि ब्लॉक दरम्यान राज्य सरकारला जादा बस चालवण्यास सांगितलं जाईल.

“आम्ही ब्लॉक्सबाबत एमआरव्हीसीकडे काही तांत्रिक अडचणी मांडल्या आहेत. आम्ही प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

मध्य रेल्वेनं सप्टेंबरमध्ये कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी १० तासांचा ब्लॉक घेतला होता.

ठाणे आणि दिवा दरम्यानचा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग प्रकल्प हा मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP 2B) चा एक भाग आहे, ज्याला २००८ मध्ये मंजुरी मिळाली होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर 100 नवीन लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत.


हेही वाचा

'या' स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवे दर

मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई या मार्गावरील 'या' एक्स्प्रेस पुन्हा धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या