Advertisement

मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई या मार्गावरील 'या' एक्स्प्रेस पुन्हा धावणार

मध्य रेल्वेनं मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई या मार्गावरील 'या' एक्स्प्रेस पुन्हा धावणार
SHARES

मध्य रेल्वेनं मुंबई-पुणे आणि मुंबई-चेन्नई दरम्यानच्या गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी दैनिक सेवा

  • १२१२७ - इंटरसिटी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून १ डिसेंबर २०२१ पासून दररोज ०६.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०९.५७ वाजता पुण्याला पोहोचेल.
  • १२१२८ - इंटरसिटी एक्सप्रेस १ डिसेंबर २०२१ पासून पुण्याहून दररोज १७.५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
  • थांबे: दादर, ठाणे, लोणावळा आणि शिवाजी नगर.
  • रचना: दोन AC चेअर कार आणि 12 द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सुपरफास्ट त्रि-साप्ताहिक सेवा

  • २२१५७ - सुपरफास्ट १ डिसेंबर २०२१ पासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून २२.५५ तासांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२.१५ वाजता चेन्नई एग्मोरला पोहोचेल.
  • २२१५८ सुपरफास्ट ४ डिसेंबर २०२१ पासून दर गुरुवार, शनिवार आणि सोमवारी चेन्नई एग्मोर इथून ०६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचेल.
  • थांबे: दादर, कल्याण, खडकी, पुणे, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, सोलापूर, अक्कलकोट, दुधनी, गंगापूर रोड, कलबुर्गी, वाडी, नलवार, यादगीर, सैदापूर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, कोसगी, अडोणी, गुंटकल, गूटी ताडीपात्री, येरागुंटला, कडप्पा, रेनिगुंटा, अरक्कोनम (फक्त २२१५७ साठी) आणि पेरांबूर (फक्त २२१५७ साठी).
  • रचना: एक AC-२ टियर, चार AC-३ टियर, ८ स्लीपर क्लास आणि ४ द्वितीय श्रेणी आसन

आरक्षण: पूर्णतः आरक्षित ट्रेन क्रमांक १२१२७/१२१२८ आणि २२१५७ साठी सामान्य भाड्यावर बुकिंग २५ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल.

प्रवाशांना बोर्डिंग दरम्यान, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड १९ शी संबंधित सर्व नियम, SOP चे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.



हेही वाचा

मुंबईकर आता बेस्टच्या हो हो बसेस डिझाइन करू शकतात

लोकलच्या प्रथम श्रेणी डब्याचे तिकीट होणार स्वस्त?

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा