Advertisement

'या' स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवे दर

मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, २५ नोव्हेंबरपासून हे तिकीट दर लागू होतील,"

'या' स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमतीत बदल, जाणून घ्या नवे दर
SHARES

मध्य रेल्वेने आज महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT), दादर, LTT, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५० वरून १० वर केण्याची घोषणा केली आहे.

कोविड-19 साथीच्या आजारामुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, सक्षम अधिकाऱ्यानं CSMT, DR, LTT, TNA, KYN आणि PNVL स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत ५० वरून १० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या अधिसूचनेनुसार, २५ नोव्हेंबरपासून हे तिकीट दर लागू होतील," 

वरील बाबी लक्षात घेता, सर्व संबंधित बुकिंग कर्मचार्‍यांना आणि पर्यवेक्षकांना सूचित केले जाते की त्यांनी बदल मान्य करावे आणि त्यानुसार कार्य करावे," असे आदेशही दिले आहेत.

कोविडचे घटते रुग्ण पाहता, भारतीय रेल्वेनं अलीकडेच ट्रेनमध्ये शिजवलेले अन्न पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो व्हायरसच्या निर्बंधांमुळे बंद करण्यात आला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा