उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

मध्य रेल्वेनं उन्हाळी हंगामात प्रवाशांच्या सोयीसाठी ४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दोन शिक्षकांसाठी पूर्णपणे राखीव असतील, जे मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस दरम्यान धावतील.

०१०५३ शिक्षक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस २.५.२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता बनारसला पोहोचेल.

०१०५४ विशेष ट्रेन ३.५.२०२२ रोजी २०.०० वाजता बनारसहून सुटेल आणि ५.५.२०२२ रोजी ०१.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस इथं पोहोचेल.

०१०५५ स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६.६.२०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता बनारसला पोहोचेल.

०१०५६ टीचर्स स्पेशल बनारस ७.६.२०२२ रोजी २०.०० वाजता सुटेल आणि ९.६.२०२२ रोजी ०१.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई स्टेशन, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, ज्ञानपूर रोड स्टेशन

दोन्ही शिक्षक विशेष गाड्यांमध्ये कोणतीही सवलत दिली जात नाही कारण त्या विशेष शुल्कावर विशेष ट्रेन म्हणून धावत आहेत.

शिक्षक स्पेशल ट्रेनचे बुकिंग केल्यानंतर, उरलेली सीट उपलब्ध असेल, सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वर इंटरनेटद्वारे बुकिंग ३०.०४.२०२२ पासून सर्वसामान्यांसाठी खुले होईल.

यासंदर्भात ॲड.आशिषजी शेलार यांनी २० एप्रिल २०२२ रोजी रेल्वे मंत्र्यांकडे पत्र व्यवहार केला होता. ॲड. आशिषजी शेलार यांनी यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालून शिक्षकांची होणारी गैरसोय रेल्वेमंत्रालयाला अवगत केली.

रेल्वे बोर्ड सदस्य कैलास वर्माजी, भाजपा नेते संजय उपाध्याय, आर.यू. सिंह, संजय पांडे व अमरजीत मिश्रा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत संपर्क साधून टीचर्स स्पेशल ट्रेन करिता प्रयत्न केले.


हेही वाचा

Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध">Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध

पश्चिम रेल्वेकडून 'या' एक्स्प्रेसमध्ये ब्लँकेट पुरवण्यास सुरुवात

पुढील बातमी
इतर बातम्या