प्रवाशांच्या सोयीसाठी, भारतीय रेल्वेनं गाड्यांमधील ब्लँकेट आणि पडदे यांच्या पुरवठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. रेल्वेत ब्लँकेट आणि पडदे देण्याचे कोरोना काळात बंद केले होते. पण कोरोनाचा आकडा कमी होत असल्यानं हे निर्बंध हटवण्यात आले.
निर्बंध मागे घेण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून, पश्चिम रेल्वेनं (WR) मुंबईहून सुरू होणाऱ्या आणखी काही गाड्यांमध्ये ब्लँकेट आणि पडद्यांची तरतूद केली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
तागाचे कापड (बेडशीट्स, ब्लँकेट्स, इ.) चा पुरवठा टप्प्याटप्प्यानं केला जात आहे. या सेवा १०० टक्क्यांवर आणण्यासाठी रेल्वे ओव्हरटाईम करत आहे.
हेही वाचा