Advertisement

बेस्टचं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच, 'असा' करायचा वापर

बेस्टच्या सामायिक कार्डाचा वापर शक्य आहे सामायिक कार्डाचा मुख्य उद्देश हा तिकीट, पास घेताना रोख व्यवहार टाळण्याचा आहे.

बेस्टचं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड लाँच, 'असा' करायचा वापर
SHARES

देशातील पहिले NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी लॉन्च करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. हे सामायिक कार्ड प्रारंभी १०० रुपयांत बेस्टच्या मुंबईतील सर्व आगारांत मिळणार आहे.

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, हे कार्ड केवळ शहरातील बसमध्येच नव्हे तर कोणत्याही प्रवासासाठी किंवा खरेदीसाठी संपूर्ण भारतभर वैध असेल. उदाहरणार्थ, १०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेले BEST चे NCMC कार्ड घेऊ शकता आणि दिल्ली मेट्रोमध्ये प्रवासासाठी देखील वापरू शकता. कोणीही किराणा सामान खरेदी करू शकतो, किरकोळ शोरूममधून खरेदी करू शकतो, संपूर्ण देशात डेबिट कार्ड म्हणून वापरू शकतो.

ते पुढे म्हणाले की, “कार्डमध्ये RuPay असेल, जे देशभरातील बहुतेक NCMC-अनुपालक आस्थापनांमध्ये वैध आहे, कोणीही ते ऑनलाइन रिचार्ज करू शकतो किंवा आमच्या बस कंडक्टरकजूनही रिचार्ज करू शकतो आणि ते वन कार्ड वन नेशनचा भाग असेल”.

बेस्टकडून एनसीएमसी कार्ड खरेदी केल्यानंतर प्रवाशांना लवकरच ७२ वेगवेगळ्या पर्यायांसह एकाच कार्डसह बस पास खरेदी करता येणार आहेत, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते डिजिटल बसेसमध्ये टॅप-इन आणि टॅप-आउट सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे.

बेस्ट दररोज ३० लाख प्रवाशांची वाहतूक करते. त्यापैकी १२ लाखांनी चलो अॅपवर स्विच केलं आहे आणि किमान २.५ लाख तिकीट किंवा पास खरेदी करण्यासाठी दररोज डिजिटल पद्धती वापरतात.

या कार्डचा वापर कसा करावा?

  • सोप्या भाषेत सांगायचे तर ही सुविधा देणारे मुंबई हे भारतातील पहिले शहर आहे. या कार्डद्वारे तुम्ही 'टॅप इन आणि टॅप आऊट' सुविधेशी जोडले जाऊ शकता.
  • एनसीएमसी कार्ड वापरण्यासाठी तुम्हाला डिझिटल बस ओळखणं गरजेचं आहे. या सुविधा देणाऱ्या बसेसच्या प्रवेशावर 'डिजिटल बस' असं लिहिलेलं असले.
  • प्रवाशांना त्यांचे स्मार्टकार्ड डिजिटल मशिनवर किंवा सेन्सर क्षेत्राजवळ टॅप करावे लागेल किंवा बसमध्ये प्रवेश करण्यासाठी 'चलो' अॅपचा वापर करावा लागेल.
  • जर स्क्रीनवर हिरवी टिक दिसली तर याचा अर्थ तुमचे कार्ड किंवा अॅप ओळखलं गेलं आहे आणि तुम्ही तुमच्या संबंधित स्थळी जाऊ शकता.
  • प्रवाशाला मागील गेटमधून बाहेर पडावे लागेल. जिथं पुन्हा एक समान डिजिटल मशीन किंवा सेन्सर उपस्थित असेल. प्रवाशांना त्यांच्या स्मार्ट कार्डवर पुन्हा टॅप करावे लागेल किंवा त्यांचा प्रवास संपला म्हणून चलो अॅप वापरावे लागेल.
  • टॅप केल्यानंतर, स्क्रीनवर पुन्हा एक हिरवा टिक दिसेल आणि प्रवाशासाठी एक पावती देखील छापली जाईल. तुमचा प्रवास संपल्याची पुष्टी करण्यासाठी, मशीन 'चला' म्हणत एक ऑडिओ रीडआउट देखील करेल आणि त्यानंतर दोन बीप होतील.
  • अॅप किंवा कार्डद्वारे प्रवासाची एकूण रक्कम आपोआप कापली जाईल.
  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी त्यांच्या खात्यात पुरेसा निधी असल्याची खात्री करणं आवश्यक आहे.



हेही वाचा

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये 'ही' नवी सुविधा सुरू, प्रवाशांसाठी फायदेशीर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा