Advertisement

Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध

आता, एटीव्हीएम, यूटीएस/पीआरएस काउंटरमध्ये तिकिटांचे पेमेंट करण्यासाठी प्रवासी कोणतेही UPI सक्षम अॅप वापरू शकतात.

Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध
(File Image)
SHARES

मध्य रेल्वेनं UTS काउंटर आणि ATVM वर POS, QR/UPI सुरू करून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पुढाकार घेतले आहेत. आता प्रवासी ATVM, UTS/PRS काउंटरवर तिकिटांच्या पेमेंटसाठी कोणतेही UPI अॅप वापरू शकतात.

इतकेच नाही तर ATVM स्मार्ट कार्ड नेट बँकिंग/UPI द्वारे "UTS on Mobile" वेबसाइटद्वारे रिचार्ज देखील केले जाऊ शकतात.

त्याच बरोबर, मध्य रेल्वेनं (सेंट्रल रेल्वे) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/लोकमान्य टिळक टर्मिनस/पनवेल/पुणे/नागपूर आणि साईनगरची सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी दूर करण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत शिर्डीपर्यंत/ वाढवली आहे.

२०२२ मध्ये ५७४ उन्हाळी स्पेशल चालवण्याची घोषणा

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड, नागपूर, मालदा टाउन आणि रेवा दरम्यान १२६ उन्हाळी विशेष
  • दादर आणि मडगाव दरम्यान ६ उन्हाळी विशेष
  • लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार, बलिया, गोरखपूर, समस्तीपूर आणि थिविम दरम्यान २८२ उन्हाळी विशेष
  • पनवेल ते करमाळी दरम्यान १८ उन्हाळी विशेष
  • नागपूर आणि मडगाव दरम्यान २० उन्हाळी विशेष
  • पुणे आणि करमाळी, जयपूर, दानापूर, वीरांगना लक्ष्मीबाई स्टेशन आणि कानपूर सेंट्रल दरम्यान १०० उन्हाळी विशेष
  • साईनगर शिर्डी आणि दहार का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष
  • लातूर आणि बिद्री दरम्यान २ उन्हाळी विशेष

पश्चिम रेल्वेनेही मुंबई विभागासह अन्य भागातून विशेष गाडय़ांचे नियोजन केले आहे. या गाडय़ा एप्रिल ते जून २०२२ पर्यत धावतील. सध्या देशभरात करोना रुग्ण वाढू लागल्यामुळे पुन्हा एकदा खबरदारी घेतली जात आहे मात्र रेल्वेतील गर्दी वाढलेली असताना प्रवासात मात्र या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.



हेही वाचा

पश्चिम रेल्वेकडून 'या' एक्स्प्रेसमध्ये ब्लँकेट, पडदे पुरवण्यास सुरुवात

नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड रेल्वेसाठी वापरले जावे, आदित्य ठाकरेंचा प्रस्ताव

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा