टिळकनगर स्थानकातील जुना पादचारी पूल पाडला

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

रेल्वे हद्दीतील अनेक पूलांची दूरवस्था झाली असून काही पूल झुकले अाहेत तर अनेक पुलांना तडे गेल्याचे चित्र अाहे. अंधेरी पूलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनालाही याची प्रकर्षानं जाणीव झाली असून प्रशासनाकडून अाता अनेक पूलांच्या डागडुजीचं काम हाती घेण्यात अालं अाहे. काही वापरात नसलेले जीर्ण झालेले पूल पाडून टाकण्यात येत अाहेत. अशातच रविवारी दुपारी टिळकनगर रेल्वे स्थानकातील एक पादचारी पूल जमीनदोस्त करण्यात अाला.

वापरात नसलेला पूल

टिळकनगर स्थानकापासून २०० मीटर अंतरावर वाशीच्या दिशेने हा पूल होता. टिळकनगर स्थानकातील नवीन पादचारी पुलाच्या उभारणीनंतर या पुलाचा वापर बंद करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून वापरात असल्यामुळे हा पूल जीर्ण झाला होता. १९८९ मध्ये या पूलाचं बांधकाम करण्यात आलं होतं.

मेगाब्लाॅकदरम्यान पाडला

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून हा पूल पाडण्यात अाला. रविवारी मेगाब्लाॅकदरम्यान हा पूल पाडण्यात अाला. दरम्यान, हा पूल पाडताना वाहतूकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात अालं.


हेही वाचा -

वसई मिठागरांत अडकलेल्या ४०० जणांची सुखरूप सुटका

मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद


पुढील बातमी
इतर बातम्या