Advertisement

वसई मिठागरांत अडकलेल्या ४०० जणांची सुखरूप सुटका

रविवार रात्रीपासून पालघर, वसई, विरार, नालासोपारा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे वसईतील नवघर मिठागर पाण्याखाली गेले आहे. या मिठागराला लागून असलेल्या कामगारांच्या वसाहतीत देखील पाणी शिरलं. या पाण्याची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढल्याने कामगारांना इथून बाहेर पडणं मुश्कील झालं होतं. ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने इथं बचावकार्य सुरू केलं.

वसई मिठागरांत अडकलेल्या ४०० जणांची सुखरूप सुटका
SHARES

वसई पूर्वेकडील मिठागर परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या वसाहतीत पाणी शिरल्याने तिथं ४०० जण अडकले होते. या सर्व रहिवाशांना पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळालं आहे.

मिठागरे पाण्याखाली

रविवार रात्रीपासून पालघर, वसई, विरार, नालासोपारा परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे वसईतील नवघर मिठागर पाण्याखाली गेले आहे. या मिठागराला लागून असलेल्या कामगारांच्या वसाहतीत देखील पाणी शिरलं. या पाण्याची पातळी धोकादायक स्थितीपर्यंत वाढल्याने कामगारांना इथून बाहेर पडणं मुश्कील झालं होतं. ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने इथं बचावकार्य सुरू केलं. 

नवघर मिठागरात १५० घरे आहेत. त्या ठिकाणी ४०० ते ५०० कामगार राहतात. भरती आणि मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला. त्यांना महापालिकेच्या बोटीने सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आलं. या सर्व लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
-किरण चेंदवणकर, नगरसेविका 

बचाव कार्य  

पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी विवेकानंद कदम आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई महापालिका मदत पथक आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नवघर मिठाघर इथं पोहोचत तिथं काम करणाऱ्या कामगारांना होड्यांद्वारे बाहेर काढलं.

नेहमीची स्थिती

या मिठाघर परिसरात नेहमीच पाणी साचतं आणि तेथील कामगारांना प्रशासन काळजी घेण्याच्या सूचना देत असते. केवळ वसईचा हा ग्रामीण भागच नाही, तर शहरी भागातही पाणी साचलं आहे. त्यामुळे होड्या चालवून प्रशासन मदत कार्य करीत आहे, अडकलेल्या कामगारांना काढण्यात येत आहे. याठिकाणी शासकीय यंत्रणांचे कुणी पोहोचले नाही, असं म्हणणं वस्तुस्थितीला धरून नाही.हेही वाचा-

पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथं क्लिक कराRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा