Advertisement

मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद


मुंबईतील 'हे' धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद
SHARES

अंधेरी रेल्वे स्थानकावर गोखले पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर मुंबई महापालिका अाणि रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं अाहे. मुंबईतील तब्बल ४४५ पुलांचं स्ट्रक्टरल अाॅडिट करण्यात येणार असून अाता काही धोकादायक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात अाले असून वाहतूक अन्य मार्गांवरून वळवण्यात अाली अाहे.


हे पूल बंद

अंधेरी गोखले पूलावरील दुर्घटनेनंतर या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात अाली अाहे. वसईच्या पूर्व अाणि पश्चिमेला जोडणारा जुना अंबाडी पूलही बंद करण्यात अाला असून यावरील वाहतूक बाजूच्या नवीन पुलावरून वळवण्यात अाली अाहे. शनिवारी रात्रीपासून हा पूल बंद करण्यात अाला अाहे.


कलानगरचा पादचारी मार्गही बंद

कलानगरचा दक्षिण भागातील माहिम अाणि वांद्रेला जोडणार एक पादचारी मार्ग शनिवारी रात्रीपासून बंद ठेवण्यात अाला अाहे. मालाडच्या दक्षिण भागातील रेल्वे स्थानकाला जोडणारा पादचारी मार्गही बंद करण्यात आला आहे. घाटकोपरचा वसंतराव नाईक पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पूल एका बाजूला झुकल्यामुळे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.


पाच पूल धोकादायक

पश्चिम रेल्वेचे चार आणि मध्य रेल्वे मार्गावरील एक असे मुंबइतील एकूण पाच पूल वाहतुकीसाठी धोकादायक अाहेत. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात अाल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं अाहे.


हेही वाचा -

अंधेरी दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू

शिवसेना भवनजवळ पाण्याची पाईपलाईन फुटली



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा