गाडीला फास्टॅग लावला नाहीत? मग 'या' तारखेपासून भरा दुप्पट टोल

१५ डिसेंबर २०१९ पासून देशभरात फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली केली जाणार आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. या फास्टॅगच्या मदतीनं आता टोल भरायचा असून, १५ डिसेंबरपासून कोणत्याही टोलनाक्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही. 

याआधी १ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं होतं. पण केंद्र सरकारनं या कालावधीत वाढ केली असून हा अवधी १५ दिवसांनी आणखी वाढवण्यात आला आहे. म्हणजे आता १५ डिसेंबरपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं आहे.  

फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल

महामार्ग वाहतूक मंत्रालयानुसार, १५ डिसेंबरनंतर जर कुठली गाडी टोलनाक्यावरून जात असेल तर त्यासाठी फास्टॅग सक्तीचा आहे. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर अशाप्रकारेच टोल भरला जाणार आहे. तर मुंबईतल्या चेक पॉईंट्सवर मार्चपासून हा नियम लागू केला जाईल. 

फास्टॅग म्हणजे काय?

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी (RFID) तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होईल. सध्या रोख पैसे देऊन वा कॅशलेस अशा दोन्ही पद्धतींनी टोल भरता येतो. पण नवीन नियमांनुसार हा फास्टॅग असणाऱ्या गाड्यांना टोल नाक्यावर थांबावं लागणार नाही. या व्यक्तीच्या टोलची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक अकाऊंटमधून कापली जाईल.


मुंबईच्या रस्त्यांवर धावली ‘तेजस्विनी’


फास्टॅग कुठे मिळेल ?

तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत १०० रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला SBI च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल. या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कीच्या मदतीनं लॉग इन करा. लॉगइन केल्यानंतर तुमच्या गाडीचा पर्याय निवडा आणि रिचार्ज अमाउंट टाका. शेवटी पेमेंटचा पर्याय निवडून फास्टॅग रिचार्ज करा.

अजून कुठे कराल अर्ज?

याशिवाय कार, जीप्स आणि व्हॅनसाठीचे फास्टॅग हे अॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, ICICI बँक, अॅक्सिस बँक, HDFC बँक, IDFC फर्स्ट बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही विकत घेता येतील. तुमच्या जवळचं फास्टॅग केंद्र शोधण्यासाठी अॅण्ड्रॉईड फोनवर My FASTag App डाऊनलोड करता येईल. यासाठी ही http://www.fastag.org/apply-online वेबसाईटही तयार करण्यात आली असून इथे जाऊनही तुम्ही फास्टॅग अर्ज करू शकता.


हेही वाचा

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज

बीकेसी कनेक्टर वरून बेस्टच्या २०० बसफेऱ्या? 

पुढील बातमी
इतर बातम्या