Advertisement

बीकेसी कनेक्टर वरून बेस्टच्या २०० बसफेऱ्या?

वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) ते चुनाभट्टी या उन्नत मार्गामुळं (बीकेसी कनेक्टर) मुंबई पूर्व उपनगर ते नवी मुंबई मार्गावरील प्रवास जलद होणार आहे.

बीकेसी कनेक्टर वरून बेस्टच्या २०० बसफेऱ्या?
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) ते चुनाभट्टी या उन्नत मार्गामुळं मुंबई पूर्व उपनगर ते नवी मुंबई मार्गावरील प्रवास जलद होणार आहे. त्यामुळं या मार्गावरून बेस्ट या लांब पल्ल्याच्या आणखी २०० फेऱ्या चालवणार आहे. त्यामुळं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बेस्टची एक बस

बेस्टनं १४ नोव्हेंबरपासून या कनेक्टरवरून ४७३ क्रमांकाची पहिली बस चालवण्याचा निर्णय घेतला. धारावी आगार, राणी लक्ष्मीबाई चौक-सायन मार्गे वांद्रे कुर्ला संकुल येथून ही बस बीकेसी कनेक्टरवरून जाते. त्यामुळं बेस्ट प्रवाशांचा वेळ वाचला. १ ते २ महिन्यात ही संख्या २०० वर नेण्याचा बेस्टचा विचार आहे. नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, भांडुप ते वांद्रे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.

बीकेसी कनेक्टर

पूर्वी वाहनचालकांना पूर्व द्रुतगती मार्गावरून वांद्रे कुर्ला संकुलापर्यंत जाताना मोठा वळसा घालून जावा लागत होता. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाया जात असून वाहतुककोंडीला सामोरं जावं लागत होतं. मात्र, बीकेसी कनेक्टरमुळं वाहनचालकांची रोजची ३० मिनिटं वाचत आहेत.

प्रवाशांचं नुकसान

बीकेसी कनेक्टरवरून बसगाड्या वळवल्यास काही प्रवाशांचं नुकसान होणार आहे. त्यांचा विचार करून मार्ग ठरवावे लागतात. मात्र लांब पल्ल्याच्या बेस्ट प्रवाशांकरिता आणखी काही बससेवा या मार्गावरून सुरू करण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे. नवी मुंबई, ठाणे, मुलुंड, भांडुपवरून वांद्रे-कुर्ला संकुल इथं जाणाऱ्या जवळपास २०० बस फेऱ्यांचा यासाठी विचार सुरू आहे. 



हेही वाचा -

मुंबईतील 'या' चाळीचा पुनर्विकास रखडला

मेट्रो-३: मिठी नदी खालून 'इतकं' भुयारीकरण पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा