मेट्रो-३: मिठी नदी खालून 'इतकं' भुयारीकरण पूर्ण

कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम वेगानं सुरू आहे.

SHARE

कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गिकेच्या भुयारीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पासाठी जमिनीच्या खालून ३८.२८ किमीपर्यंत भुयार तयार करण्यात आलं आहे. तसंच, मिठी नदीच्या खालूनही ९१५ मीटर लांबीचं भुयार तयार करण्यात आलं आहे. मिठी नदी खालून ३ भुयार बनविण्यात येणार आहेत. त्यामध्ये १.५ किमी लांबीचे २ आणि १५४ मीटरचे १ भुयार बनविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत ६६० मीटर, दुसरे २४० मीटर आणि तिसरे १५ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.

नदीच्या खाली भुयारीकरण

मेट्रो-३ मर्गिकेवरील धारावी आणि बीकेसीदरम्यान मिठी नदीखालून १.४ किमी लांबीचा भाग आहे. या दोन्ही मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी मिठी नदीच्या खाली भुयारीकरण करण्यात येणार आहे. हे काम येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. बीकेसी आणि धारावीदरम्यान पाण्याखालून सुमारे २५ मीटर खालून मेट्रो जाणार आहे.

मेट्रो टनेलचा मार्ग

मिठी नदीखालून १.५ किमीचे २ भुयार आणि १५४ मीटरचं तिसऱ्या भुयाराचा वापर स्टैबलिंग लाईनसाठी करण्यात येणार आहे. बीकेसी स्थानकापासून काही मेट्रो रद्द होऊन पुन्हा परत जाणार आहे. रद्द केलेल्या मेट्रो टनेलचा मार्ग बदलण्यासाठी या मार्गाचा उपयोग करण्यात येणार आहे. या भुयारीकरणाचं काम टनेल बोरिंग मशीनतर्फे (टीबीएम) केलं जात आहे. टीबीएमच्या साहाय्यानं मिठी नदीखालून आत्तापर्यंत ९०० मीटरपर्यंत भुयारीकरणाचं काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणं, नेटम ही तांत्रिक पद्धती वापरून १५४ मीटर लांबीचं भुयार तयार करण्यता आलं आहे.



हेही वाचा -

मुंबईच्या रस्त्यांवर धावली ‘तेजस्विनी’

'हा' रेल्वे प्रकल्प महागला, प्रवासी नाराज



संबंधित विषय
ताज्या बातम्या