Advertisement

मुंबईतील 'या' चाळीचा पुनर्विकास रखडला

ही चाळ धोकादायक असून, सुमारे १०० वर्षे तग धरून राहिलेल्या शिवराम चाळीत रहिवाशी जीव धोक्यात घालून राहत आहेत.

मुंबईतील 'या' चाळीचा पुनर्विकास रखडला
SHARES

मुंबईतल्या काळाचौकी येथील डॉ. शिवराम चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा अद्याप रखडला आहे. ही चाळ धोकादायक असून, सुमारे १०० वर्षे तग धरून राहिलेल्या शिवराम चाळीत रहिवाशी जीव धोक्यात घालून राहत आहेत. तसचं, पुनर्विकास होत नसल्यानं कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. या शिवराम चाळीत ६७ कुटुंबे आणि २५ दुकानं आहेत.


धोकादायक इमारती

या चाळीकडं म्हाडाचं वारंवार लक्ष वेधण्यात आलं. मात्र तरीही अधिकाऱ्यांकडून बेफिकिरी दाखवली जात आहे. त्याचप्रमाणं मुंबईतील जुन्या, धोकादायक इमारतींचा प्रश्न चिंतेचा असल्यानं त्यावर तातडीनं उपाय करण्याची मागणी सध्या केली जात आहे.


इमारतीचा पुनर्विकास

या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडं पाठपुरावा सुरू आहे. उपकरप्राप्त (सेस) वर्गवारीत येणाऱ्या शिवराम चाळीची जबाबदारी म्हाडाच्या मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडं आहे. शहरात बहुतांश सेस चाळी, इमारती धोकादायक अवस्थेत असून, तिथं तात्पुरत्या दुरुस्तीचा उपयोग शून्य असल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे.


चाळ धोकादायक

मुंबई पालिकेनंही ही चाळ धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. या चाळीच्या सद्यस्थितीविषयी डॉ. शिवराम रहिवासी सेवा संघानं पत्राद्वारे म्हाडाकडं पाठपुरावा केला आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी तिथं पाहणी केली असली, तरीही काहीही निष्पन्न झालेलं नसल्याचं सांगितलं जात आहे.हेही वाचा -

मेट्रो-३: मिठी नदी खालून 'इतकं' भुयारीकरण पूर्ण

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांची घोषणासंबंधित विषय