मध्य रेल्वेच्या लोकल फेऱ्यांच्या वेळेत बदल

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर १४ डिसेंबरपासून उपनगरी रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांमुळं बिघडलेला लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी ४२ लोकलच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

काही फेऱ्यांची भर

नवीन वेळापत्रकानुसार परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी काही फेऱ्यांची भर पडली आहे. हे नवीन वेळापत्रक मध्य रेल्वे मार्गावरील लोकलकरीताच आहे. यामध्ये हार्बर आणि ट्रान्स हार्बर प्रवाशांसाठी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. ठाण्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल फेऱ्यांचा कल्याण, डोंबिवलीपर्यंतही विस्तार करण्यात आला असून, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, टिटवाळा प्रवाशांनाही यातून दिलासा दिला आहे.

लोकलच्या फेऱ्या

  • सकाळी ६.४८ वाजताची कल्याण ते दादर, सकाळी ९.५४वाजताची टिटवाळा ते ठाणे लोकल आणि सकाळी ११.१७ वाजताची कल्याण ते दादर लोकल परळ स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे.
  • दादर स्थानकातून सुटणारी सकाळी ८.०७ वाजताची कल्याण लोकल परळ स्थानकातून ८.११ वाजता सुटणार आहे.
  • सीएसएमटी स्थानकातून सकाळी ११.४२ वाजताची कल्याण लोकल परळ स्थानकातून त्याच वेळेत सुटणार आहे.
  • दादर स्थानकातून दुपारी १२.३७ वाजता सुटणारी डोंबिवली लोकल परळ स्थानकातून १२.३४ वाजता सुटणार आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वेच्या 'या' मार्गावर धावणार एसी लोकल

अखेर कांद्याचे दर उतरले; प्रतिकिलो ६५ रुपये


पुढील बातमी
इतर बातम्या